मंगळवार, १ एप्रिल, २०२५

आई / माय ( कविता )

 💖 🌿  💖 🌿 💖✍......आई/माय........💖 🌿  💖 🌿 💖✍(आपल्या आईसाठी काही वेळ काढून नक्की वाचा)

   

  आईसारखा मायेचा सागर जगात नाही.आईसारखी दुसरी हक्काची जागा ह्या जगात कुठेच नाही.आई शब्दाचा अर्थ 'आ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर.ईश्वर प्रत्येकाला मिळतो का हे मला माहीत नाही पण आईच्या स्वरूपात असणारा ईश्वर जो जन्म घेतो त्या सर्वांना नक्की मिळतो.फरक एवढाच असतो काहींना आईच प्रेम शेवटपर्यंत भेटते तर काहींना ते अल्पकाळ भेटते.

   जेव्हा आपण आईचा आपल्या बाळांसाठी केलेला संघर्ष पाहतो,तेव्हा आई खरंच आपल्या बाळांसाठी काय काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरकणी,झाशीची राणी.किती दुःख  हसत सहन करते आई हे प्रामुख्याने जाणवते.मग मुले मोठी झाल्यास आईवडिलांना का विसरतात?भारतात वृद्धआश्रमात मग कोणाचे आईवडील आहेत?आई हे असे व्यासपीठ आहे जिथे आपण मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो.कुठे गेली ती पिढी जिथे आईच्या इच्यछेसाठी छ.शिवाजी महाराजांनी पूर्ण जीवन व्यतीत केलं.कुठे गेले रामासारखे पुत्र जे आपल्या सावत्र आईचे वचन पाळण्यासाठी वनवासात गेले होते?असे मातृपित्रू भक्त हल्ली का दिसत नाहीत जास्त..??

    वडीलंचे पण महत्व हे आहेच परंतु आपण दिवसामधला जास्त काळ आईसोबत जात असतो त्यामुळे एक वेगळीच नाळ आईसोबत आपली जुळलेली असते आणि आपण बाबांना जास्त घाबरत असतो म्हणून आईजवळ जास्त करून आपण आपले मत मांडत असतो.

  "जेंव्हा घर सोडून लांब राहतो तेव्हा आईच्या मायची खरी किंमत माहिती पडते""जेव्हा सकाळी लवकर जाग येत नाही तेव्हा लवकर उठवण्यासाठी आई आठवते""जेव्हा ह्या धावपळीच्या जीवनात,मायेची सावली आणि पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आई जाणवते""जेव्हा बाहेरचे बेचव जेवण खातो तेव्हा आईच्या चवीच्या जेवणाची किंमत कळते"

खरं पाहिलं तर आई-वडिलांवर जेवढे लिहाल तेवढं कमीच असतं..त्यांना अस एक पानावर स्पष्ट करता येत नसतं...

..............🦋🌺😇💞..............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स

निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३ पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते  ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा  ते आई बाप जिवं...