EK FUL VAHTO SAKHE / MARATHI LYRICS SONG / PRIYANKA BARVE
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
नजरेचा जीवघेणा
हा खेळ ही नवा गं
गवताचं घर माझं
तू वादळी हवा गं
तुझ्या आडोशाला राहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
तू मळा अंगुराचा
मी लाकडी भुसा गं
तू शेरणी शिकारी
मी भाबडा ससा ग
तरी पैज लावतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
मी वाळलेला वाफा
तू भरल्या ढगावानी
तुझ्या नजरेचा फवारा
हा जीव पाणी पाणी
तुझ्याविना वाळतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखेजवा तुला पाहतो सखे
मी वेल तुझ्याभोवती
तू झाड चंदनाचं
हे रूप रोप आहे रे
तुझ्या अंगणाचं
आज तुला माळते सख्या
जवा तुला पाहते संख्या
एक फूल वाहते सख्या
जवा तुला पाहते सख्या
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा