धावजी पाटील / Dhavji Patil
म्हसन वट्यात निघाला धावजी
आमोष्या रातीला //२//
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला //२//
अंधार सारा भयाण तिथं मडी बी लागलेत जळाया
चाहूल लागत बाबाची मग भूत बी लागली पाळाया //२//
झालाय आहा कर घाम फुटला मातीला //२//
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला. //२//
रसाळ निंबु भरुन मंत्र फोडीतो कसा दातान
आरोळी ठोकत निघाला धावाजी म्हसान खाईच्या वाटाण //२//
शंकिनी डंकिणी आल्या त्याच्या भेटीला
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला. //२//
आर बंगाली विद्या अघोरी मंत्र खेळ खेळतो राखाण २
चांगला सुध्दा थर थरतोय धावजी बुवांच्या धाकान //२//
अथर्व अजय कंठात गाठीला
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला. //२//
म्हासान वाट्याला निघाला धवजी
अमोष्या रातीला //२//
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला //२//
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा