![]() |
नवनाथ / Navnath |
शंकर भगवान रे देव विचार कर रे //२//
नवनाथांन रे देवा अवतार घ्यावा रे
नवनाथांन रे पुन्हा अवतार घ्यावा रे
मच्छिंद्र जनमला देव माश्यांच्या पोटी रे
गोरक्ष जनमला देव गौरी भस्मात रे
गहिनी जनमला देव मातीच्या पुतळ्यात रे
एकच गुरू रे आहे दत्तात्रेय बाबा रे
विष्णू भगवान रे देव विचार कर रे //२))
नवनाथांन रे देवा अवतार घ्यावा रे
नवनाथांन रे पुन्हा अवतार घ्यावा रे
जालिंदर जनमला देवा यज्ञ कुंडात रे
कानिफ जनमला देव हत्तीच्या कानात रे
भर्तरी जनमला देव भिक्षा पात्रात रे
एकच गुरू रे आहे दत्तात्री बाबा रे
ब्रम्ह देव रे देव विचार कर रे. //२//
नवनाथांन रे देवा अवतार घ्यावा रे
नवनाथांन रे पुन्हा अवतार घ्यावा रे
रेवण जनमला देवा रेवा ह्या तीरी रे
चटपटी जनमला देवा गवता मधून रे
नागेश जनमला देव सर्प कुळात रे
यांचे गुरू रे आहे दत्तात्री बाबा रे
मार्कंड ऋषी रे ऋषी विचार कर रे
नवनाथांन रे देवा अवतार घ्यावा रे
नवनाथांन रे पुन्हा अवतार घ्यावा रे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा