शिव गोरक्ष नाथ निघाले फेरीला //२//
नाथ भक्ताचा तईवारी नाथ भक्ताचा तईवारी
भिक्ष्या मांगतो दारोदारी //२//
नाथ गेलाय पर्वतावरी //२//
काखेत झोळी चिमटा हाताला
शिव गोरक्ष नाथ निघाला फेरीला //२//
आहे दत्त गुरूची साथ आहे मच्छिंद्राची साथ
जीवंत केला मिननाथ //२//
अरे शिवशंभूचा चेला हाताला
शिव गोरक्ष नाथ निघाले फेरीला
काखेत झोळी चिमटा हाताला
शिव गोरक्ष नाथ निघाला फेरीला //२//
असा होता रे भक्तीवान शिवगोरक्ष बुध्दीवान
याने आणले गुरुनाथ परत आणले गुरुनाथ //२//
काखेत झोळी चिमटा हाताला
शिव गोरक्ष नाथ निघाला फेरीला //२//
तुला भस्माचा रे मान तुला भस्माचारे मान //२//
नाथ खेळती आनंदान //२//
काखेत झोळी चिमटा हाताला
शिव गोरक्ष नाथ निघाला फेरीला //२//
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा