तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
बाजारी जाताना घोर वाटे जीवाला
कुठून अचानक येतो अडवा वाटेला
दही दूध चोरून माझा घडा फोडितो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
जमऊनी गोपी राधा सांगे गवळनिंना
गोकुळत साऱ्या कान्हा घालतो धिंगाणा
गोठ्यातल्या गाई म्हसी तो ग सोडीतो
तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढीतो
यशोदा म्हणे अत्ता बांधून उखळाला
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
विनवाणी त्याला आज हाथ जोडीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा